जम्मू : केंद्र सरकार, जम्मू आणि काश्मीर प्रशासनाकडून अमरनाथ यात्रेकरुंना आवश्यक सुविधा पुरविल्या जातील, असे गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले. अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक जम्मू आणि काश्मीरमध्ये येतात. यंदाच्या यात्रेला ३ जुलैपासून प्रारंभ होत आहे. ती ३८ दिवस चालणार असून ९ ऑगस्ट रोजी यात्रेचा समारोप होत आहे. दरम्यान, शहा हे जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आले आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरसह यात्रेची सुरक्षा आणि तयारीचा आढावा घेतला. ऑपरेशन सिंदूर कारवाईवेळी ७ आणि १० मे रोजी पाकिस्तानी सैन्याने पूंछ परिसरात तोफगोळ्े, क्षेपणास्त्रांचा मारा करण्याबरोबर गोळीबार केला होता. त्यात २८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात १४ नागरिकांचा समावेश होता. तेथील बाधित नागरिकांची शहा यांनी भेट घेतली.
Fans
Followers